Tuesday, 19 January 2016

शहाणपण
इथे वाटतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे
वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे

जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे

तो क्षण निघून गेला अन मी पाहतच राहीलो…….
एकदा एका डोळे मध्यल्या अश्रुने दुस-याला विचारले……
‘ए का रे आपण असे
ना रंग, ना रूप,
नेहमीच मात्र चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा अहेर,
कोणीच कसे थांबवत नाही आपल्याला,
किनारा ही साधा नाही या पापण्याला…………
दुस-यालाही जरा मग प्रश्न पडला,
खुप विचार करून मग तो बोलला,
रंग-रूप नसला तरीही,
चिडीचुप असलो जरीही,
आधार ठेवतो भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपणच ,
अंतरीही खोल आपणच ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच मात्र महत्व,
आपल्याला कोणी नाही थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बांधु शकत,
उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील स्पंदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे.
अशीच आपली ही कहाणी………
ऐकून अश्रुंची ही वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत हळुच आले पाणी……..

No comments:

Post a Comment